छत्रपती संभाजीनगर
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात अनेक गावातील तलाठी
कडून ई-पिक पाहणी केली पण तलाठी सजा यांनी ई पिक पुढे अपलोड केले नसल्याने हजारो शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत ! शेतकऱ्यांच्या नुकसाभरपाईचा भार कोण उचलणार, असा संतप्त प्रश्न सावळदबारा व सोयगाव विभागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे! कापूस आणि सोयाबीन पिकांचे ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीत न येता, इतर शेतकऱ्यांची नावे मात्र आली आहेत! त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत. तलाठी ई-पिक पाहणी करून कृषी विभागाला देणे हे त्यांचे काम असते, पण 2023 मध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सोयगाव तलाठ्यांनी कोणतीच पाहणी न करता बोगस यादी सादर केली. या यादीतील नावांची तपासणी केल्यास शेकडो नावे बोगस असल्याचे आढळून आले आहेत. शेतकऱ्यांनी तलाठ्यांच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला. त्यामुळे संबंधित तलाठ्यांनी ही बोगस यादी कोणाच्या माथी लावणार असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून होत आहे.
तलाठ्यांच्या बेजबाबदार कामगिरीने शेतकरी संतप्त !
“”””सोयगाव तलाठ्यांच्या बेजबाबदार कामामुळे ई-पिक पाहणी अनुदान, पी. एम. किसान योजना, आनंदाचा शिधा वाटप योजना, शिधापत्रिका मिळण्यास अडचणी येत आहेत. स्वस्त धान्य यादीतून अचानक नावे कमी होणे, भोगवटा दोनच्या जमिनीची परस्पर विक्री हे प्रकार घडत आहेत.महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सोयगाव विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांची चौकशी करून, संबंधित कर्मचाऱ्यांना दररोज सज्जा ठिकाणी हजर राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
Users Today : 36