पुणे (पिंपरी) : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेल्या वाकडमधील फिनिक्स मॉलच्या गेटवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. माथाडी कामगार वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. विकी बाळा शिंदे असं संशयित व्यक्तीचं नाव असून माथाडीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगलोर महामार्गलगत असलेल्या वाकड परिसरातील फिनिक्स मॉलच्या गेटवर काल मंगळवारी दुपारच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून आलेल्या एका व्यक्तीने अचानक गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर संबंधित व्यक्ती हा घटनास्थळावरून पसार झाला. मात्र गोळीबार केल्याची घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या गोळीबाराच्या घटनेनं मॉल परिसरामध्ये असलेले नागरिक पळून गेले. या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार नेमका कशातून घडला हे अद्याप समोर आलेले नसले तरी माथाडी कामगारांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलिसांकडून केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. खून, दरोडे, बलात्कार, असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचं आहे. याशिवाय अल्पवयीन मुले देखील गुन्हेगारीत येताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या गुन्हेगारीला वेळेत आळा बसवणे गरजेचं आहे.
Users Today : 9