*सरस्वती नगरच्या हनुमान मंदिरात हास्ययोग क्लब चा प्रथम वर्धापन दिन साजरा*
नागपूर: (दि.१४ सप्टेंबर)
दक्षिण नागपूर येथील, सरस्वती नगर हनुमान मंदिरात, हास्य योग क्लब योगाला एक वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्ताने रविवारी सकाळी हास्य योग वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजू मिश्रा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी ब्रह्मलीन परमपूज्य परमहंस श्री जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलतांनी राजू मिश्रा यांनी सर्वप्रथम हास्य योगा क्लब च्या पहिल्यांदाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आणि सर्व हास्य योगाच्या सदस्यांचे अभिनंदन केले आणि उपदेश दिला की, विठ्ठल… विठ्ठल.. आपण सर्वांनी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून जोराने विठ्ठल नावाचा टाळ्या वाजवून गजर करा असा उपदेश दिला. तसेच याप्रसंगी नरेश भांदककर यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत हास्ययोग क्लबच्या सदस्यांना 24 तासामधून प्रत्येकानी आपल्याकरिता 24 मिनिटे तरी द्यावे आणि आपले जीवन निरोगी करावे असा उपदेश दिला. हास्ययोग क्लबचे अध्यक्ष राजपाल सिंग बैस यांनी आपल्या भाषणात सांगितले की खरा जीवनसाथी म्हणजे निरोगी शरीर जर शरीर निरोगी राहिलं तर आपण स्वस्थ राहू असा सल्ला दिला म्हणून प्रत्येकांनी नियमितपणे योग करायला पाहिजे असे सुद्धा यांनी सांगितले. कार्यक्रमा दरम्यान मंचावरील प्रमुख अतिथी पाहुणे सौ.डॉ.राखी खेडीकर विनायक बारापात्रे, मनोहर पाल, नरेश भांदककर, कृष्णा इंगोले, डॉ. मिलिंद वाचणेकर आणि राजपाल सिंग बैस यांची उपस्थिती होती. सन्माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथीगणांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी पाहुण्यांचा परिचय व स्वागत रामकृष्ण बांगडे यांनी करून दिला तसेच प्रास्ताविक अनंता गुंडलवार यांनी केले. याप्रसंगी हास्य योग क्लबचे सदस्य संपूर्णपणे कार्यक्रमात सहभागी झाले होते. हास्य योग वर्धापन दिनानिमित्त सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे तसेच उपस्थित योग प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे गुलाबाचे फुल देऊन मनःपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजपालसिंग बैस, सुनील बिंगेवार, लांजेवार, ठवकर साहेब, प्रकाश नेरकर, सुधाकर भिसीकर, अंबाडकर, रामकृष्ण बांगडे, रणदिवे, वासुदेवराव मेश्राम, वटघट, अशोक शहारे, जॉन सर, आणि सौ. ठवकरताई तसेच देवराव प्रधान यांनी अथक परिश्रम घेतलेत. संचालन सिद्धार्थ कांबळे यांनी केले तर आभार अरुण कोहाड यांनी मानले.