अतिशय अतुट प्रयत्नांतून साकार होऊन जागतिक पातळीवर प्रकाशित होणारे पहिले पुस्तक “स्वतः पासून मुक्त व्हा”
Emancipation from one self डॉ.संकेत अन्नाजी झाडे (नागपूर) यांचे Iterative International Publishers (IIP) बँगलोर द्वारा नागपुर येथे Nima conference -2024 मध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. हे पुस्तक सर्वत्र ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध झाले आहेत. जे लोक अंधारात रस्ता शोधण्यासाठी धडपडत आहेत. आणि ज्यांना अधिक सुंदर व अर्थपूर्ण आयुष्य जगायचे आहेत त्यांच्यासाठी प्रस्तुत पुस्तक उत्कृष्ठ मार्गदर्शक ठरेल. सदर निमाकॉन कॉन्फरन्स ही किम्स किंगस्वे हॉस्पिटल परवाना हॉल मध्ये नुकतीच पार पडली. आणि या कार्यक्रमासाठी जवळपास ७०० ते ८०० डॉक्टर्स संपूर्ण विदर्भातील सहभागी होऊन उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर संकेत झाडे यांचे अभिनंदन करून त्यांच्यावर उच्च स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Users Today : 18