राज्यात बहिणीच नव्हे, भाऊही लाडके; अजित पवारांचं ट्विट चर्चेत, तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Khozmaster
2 Min Read

मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून ‘लाडकी बहीण योजने’ची चर्चा सुरू आहे. त्यातच राज्यातील बहिणीच नव्हे, तर भाऊही लाडके असल्याचे नमूद करीत तरुणांसाठीच्या विविध योजना अधोरेखित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ पोस्ट करून युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत मिळणाऱ्या प्रशिक्षण आणि १० हजार रुपये विद्यावेतनाची माहिती दिली आहे. राज्यातील तरुणांना महाराष्ट्रवादी या हेल्पलाइनच्या माध्यमातून पक्षाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.अजित पवार यांनी ‘लाडक्या भावां’च्या योजनेचा एक व्हिडीओ बुधवारी सकाळी ट्विट केला. ‘योजनांची नांदी जशी बहिणींसाठी…तशीच भावांसाठीसुद्धा…’ असे नमूद करीत, अजित पवारांसाठी सगळेच लाडके आहेत, अशा आशयाची ही जाहिरात आहे.

तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महायुती सरकारमधील तिन्ही घटकपक्ष या योजनांचे श्रेय लाटण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असतानाच आता राष्ट्रवादीने तरुणांसाठी असलेल्या योजनांची माहिती पक्षाच्या हेल्पलाइनच्या माध्यमातून देण्याचे नियोजन केले असून, या माध्यमातून तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी १४५चा मॅजिक आकडा‘सर्वच कार्यकर्त्यांना वाटते की, आपापला नेता हा मुख्यमंत्री व्हावा. पण सर्वांची इच्छा पूर्ण होते, असे होत नाही. मुख्यमंत्रिपदासाठी १४५चा मॅजिक आकडा पार करावा लागतो. दुसरी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे कोणाला मतदान करायचे आहे, हे मतदार राजा याच्या हातात असते,’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मंगळवारी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाच्या गणपतींचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘सर्वांना सुख, शांती मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, असे गणरायाला साकडे घातले,’ असे त्यांनी सांगितले.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *