श्रीमती सारिका नागरे यांना शहीद चंद्रशेखर आजाद पुरस्काराने सन्मानित

Khozmaster
3 Min Read
  1. लातूर;सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा व १४ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १७/१८ सप्टेंबर रोजी प्रणव श्रीमंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाले या अधिवेशनामध्ये भारत देशामधिल पदाधिकारी उपस्थित होते!निजामाच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त  करून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिल त्या थोर वीर महापुरुषांना व वीरपत्नी, वीरमातां, वीरपिता, यांचा व त्यांच्या परिवारांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान व गौरव करण्यात आला या दिमागदार सोहळ्यामध्ये संपूर्ण देशामधून आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला २०२३/२० २४ या वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट  कार्यकर्त्यांनी काम करीत असताना सामाजिक सलोखा जोपासून समाजकार्यासाठी सेवा करत असताना अमुल्य योगदान दिले त्याचबरोबर सर्व घटकातील महिलांना पिडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे काम केलं त्या पदाधिकाऱ्यांचा  शहीद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला नाशिक रोड नाशिक  येथील  रहिवासी असलेले श्रीमती सारिका नागरे नाशिक सामाजिक कार्यकर्ते  यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक पिडित कुटुंबांना न्याय मिळवून दिला त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडे करून अनेक अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची !शास्तीची कारवाई व दंड लावण्यास वरिष्ठांना भाग पाडले त्यामुळे यांच्या कार्याची दखल घेऊन  संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या शिफारशीनुसार प्रदेश सरचिटणीस श्रीमती सारिका नागरे नाशिक  यांना शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे..? या दोन दिवस व राष्ट्रीय अधिवेशनास राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा ),राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख ,राष्ट्रीय सरचिटणीस अमोलजी नानाजकर राष्ट्रीय सरचिटणीस, राजू पाटील सिपांळकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्र पाटील, प्रदेशाध्यक्षा अँड राणीताई स्वामी, प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके, प्रदेश निवड कमिटी अध्यक्ष अनिल दादा देसले ,प्रदेश अध्यक्ष सैनिक विभाग उल्हास दादा , प्रदेश युवती सनाताई शेख,राष्ट्रीय समन्वयक  हितेश दाभाडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत सोयगाव यासह अनेक मान्यवराच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील तमाम पदाधिकाऱ्यांनी प्रदेश सरचिटणीस श्रीमती सारिका नागरे नाशिक यांचा अभिनंदन केले नाशिक जिल्ह्यात सर्वत्र त्यांच्या कार्याच अभिनंदन होत आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना श्रीमती सारिका नागरे यांनी सांगितले की मला मिळालेला शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्या कार्याची पावती व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मिळाला! याप्रसंगी अमोल भागवत, हितेश दाभाडे, सुरेश बडे, निर्मला बुल्हे, किरण थोरात, सुर्यकांत जाधव, सुनील जाधव, दिनकर चव्हाण, दिलीप गायकवाड, रोहिणी वाघ सुखदेव शेटे,पूजा पटेल यांनी श्रीमती सारिका नागरे नाशिक याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *