उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये एका शिक्षकाच्या संपूर्ण कुटुंबाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. शिक्षक पती, त्याची पत्नी आणि दोन मुलांवर गोळी मारुन संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. शनिवारी रायबरेलीमधील या कुटुंबावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी चंदन वर्मा याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाच्या पत्नीने जीवंत असताना चंदन वर्मासोबत वाद असल्याचं म्हणत आमच्या कुटुंबाला काही झालं, तर चंदन वर्मा जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. तसंच मृत शिक्षकाच्या वडिलांनीही चंदन वर्मावर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात महत्वाची माहिती दिली आहे.
शिक्षकाच्या पत्नीचं आरोपीसोबत अफेअर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिक्षकाच्या पत्नीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. यामुळेच त्याने त्याच्या प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबालाच संपवलं. एका कुटुंबाला त्याने एकाच पिस्तुलातून गोळ्या झाडून मारलं. त्याने या पिस्तुलातून १० राऊंड फायर केल्या होत्या.
पोलीस एन्काऊंटमध्ये चंदन जखमी
हे हत्याकांड करणारा आरोपी चंदन वर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र तो पोलिसांचं पिस्तुल हिसकावून तिथून पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचं एन्ट्राऊंटर झालं. यावेळी त्याच्या पायाला गोळी लागली होती.या कुटुंबातील महिलेने एक महिना आधीच चंदन वर्मा विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत आणि विनयभंग केल्याप्रकरणी एक एफआयआर दाखल केली होती. या एफआयआरमध्ये तिने असंही सांगितलेलं, की काही घटना त्यांच्या कुटुंबासोबत घडल्यास, तो व्यक्ती जबाबदार असेल. दरम्यान, संपर्ण कुटुंबाची हत्या झाल्यानंतर शिक्षकाच्या वडिलांनी चंदन वर्माविरोधात गुन्हा दाखल केला होता.
Users Today : 21