शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; ईश्वर हिवाळे
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यात व पहूर
परिसरात या परिसरात चार ते पाच दिवस दिनांक ११/१०/२०४ रोजी सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह सोंगून टाकलेले सोयाबीन,कपाशी, मका खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसगाँने हिसकावला. खरीप हंगामात कमी पावसामुळे फळबागा सोयाबीन व कपाशी मका पिकाचे नुकसान झाले. त्यातच कपाशी व सोयाबीनला अल्प भाव आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे ईश्वर हिवाळे व प्रा.शंकर भामेरे यांनी शिंदे सरकार कडे केली आहे.शेतकऱ्याना खरीप हंगामापासून अपेक्षा होत्या, खरीप हंगामात मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कपाशी सोयाबीन मका या पिकांची पेरणी केली.
मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान
झाले. परतीच्या पावसाने व अवकाळी पाऊस, वादळी
वारा व शेतीपिके व फळपिकांच्या
बाधित झालेल्या नुकसानीबाबत
प्राथमिक अंदाजित जामनेर कृषी विभागाने
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा असे निवेदन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या कडे देण्यात आले आहे.यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत जीवन जगत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. शेतकरी खरीप पिकाच्या आशेवर होता. मात्र, हाती तोंडी आलेला घास निसर्गान हिरावून नेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नुकसानभरपाईचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची संघटनेचे पदाधिकारी ईश्वर हिवाळे व प्रा शंकर भामेरे यांनी केली आहे.जामनेर, पहूर व शेंदुर्णी या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊसने थैमान घातल्या मुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, मका, मिरची व कापून ठेवलेला कडबा याचे अतोनात नुकसान झाले आहे यानुसार इकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून याचा जामनेर महसूल विभाग व कृषी विभाग व पिक विमा कंपनीने तात्काळ सर्वे करण्याचा आदेश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पहूर कसबे शहर प्रमुख शंकर भामेरे व ईश्वर हिवाळे यांनी केली आहे.
Users Today : 18