डर सबको लगता है! बिश्नोई टोळीच्या सततच्या धमक्या, सलमान खाननं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का

Khozmaster
2 Min Read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला मोठा धक्का बसला आहे. सलमान सोबत जवळचे संबंध असल्यानं बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचं सुरुवातीला म्हटलं गेलं होतं. तर आता सलमानच्या जीवालाही धोक्या असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. या सगळ्याचा परिणाम आता त्याच्या करिअरवर होणार असल्याचं दिसून येतंय.

या घटेनंतर सलमान खान त्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र आता यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे. सलमान खानच्या जीवाला धोका असल्यानं पोलिस यंत्रणेवरही याचा ताण आहे. गेल्या आठवड्यात सलमान खान यानं बिग बॉस १८ चं शूटिंग केलं, पण यासाठी तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. पण आता यापुढच्या शूटिंगसदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

शूटिंग पुढे ढकललं :
काही महिन्यांपूर्वी सलमाननं त्याच्या सिकंदर या सिनेमाची घोषणा केली होती. यानंतर त्यानं शूटिंगलाही सुरुवात केली होती. मात्र आता सलमाननं मोठा निर्णय घेत या सिनेमाचं शूटिंग थांबवलं आहे. सध्याचं वातावरण पाहाता इतरत्र शूटिंग करणं धोक्याचं ठरू शकतं, त्यामुळं आता सलमानला कोणताही धोका पत्करायचा नाहीये, याच मुळं त्यानं सिकंदरचं शूटिंग पुढे ढकललं आहे.

सिंघम अगेनमधूनही बाहेर:
तर रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या सिंघम अगेन या सिनेमात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार होता. यात तो पाहुण्याकलाकाराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता तो या सिनेमात दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे. सिंघम अगेनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत, सलमान खाननंही यात छोटीची भूमिका करावी अशी रोहित शेट्टी इच्छा होती, पण आता त्याची ही इच्छा पूर्ण होणार नाहीये.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *