मेहकर :-(कार्यालय प्रतिनिधी)
लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी भैय्यासाहेब पाटील यांची नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली.
भैय्यासाहेब पाटील हे गेल्या १५ वर्षांपासुन मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात जनतेसाठी काम करित असुन त्यांना गोरगरिबाची जाणीव आहे. भैय्या साहेब पाटील यांनी जनतेच्या भावना समजून त्यांच्या दुख सुखात नेहमी सहभागी होत असुन त्यांच्या समस्या सोडत असतात. मेहकर व लोणार तालुक्यातील अनेक आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. शिबिराच्या माध्यमातून त्यांनी जनतेसाठी अनेक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांची जनतेशी नाळ जुळलेली आहे. जनतेच्या आशिर्वादानेच मी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाची लढाई लढत असून जनता जनार्दन राज ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच मी मेहकर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे भैय्यासाहेब पाटलांनी सांगितले.
Users Today : 21