माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर आज शिवबंधन तोडून हातात बांधणार घड्याळ!!

Khozmaster
1 Min Read
सिंदखेडराजा विधानसभेसाठी महायुतीची उमेदवारी निश्चित
सिंदखेड राजा:-(विशेष प्रतिनिधी)
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर हे आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कडे एकमेव सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज देखिल दाखल केला आहे. महायुतीमध्ये अनेक इच्छुक होते. परंतु माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. गायत्री शिंगणे यांनी सुध्दा अजित पवारांची भेट घेतली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे गायत्री शिंगणे काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
आमदार खेडेकर निश्चित
सिंदखेडराजा मतदारसंघात संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे तसेच अनेक मतदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत उपलब्ध करून दिली असल्याने डॉ शशिकांत खेडेकर यांनी केली असल्याने मतदार संघातील मतदारांचा कल लक्षात घेता या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय होऊन आमदारकीचा गुलाल त्यांच्या वर पडणार अशी चर्चा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात सुरु आहे
0 9 4 9 9 0
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *