खामगांव जि. बुलढाणा :- महाराष्ट्रात निवडणुकीचा चांगलाच रंग चढला आहे. विधानसभेसाठी अनेक दिग्गज रिंगणात
उभे आहेत. खामगाव मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार “आकाश दादा ला उमेदवारी देत पहिल्या यादीत नाव जाहीर केले.
विधानसभेसाठी भाजपकडून इच्छूक असलेले बजरंद दलाचे नेते “अमोल भाऊ” यांनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेवून आमदारकी
लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहे. कट्टर हिंदुत्ववादी व भाजपशी निष्ठावान असलेले भाऊ
नाराज झाले. तर कार्यकर्त्यानी घोषणा देत “एकच निर्धार भाऊ होणार आमदार”, “मी अमोल अंधारे” म्हणत अपक्ष उमेदवारी
लढविण्याचे संकेत दिले. त्यामुळे अॅड.अमोल अंधारे यांनी 27 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत भरपूर लोक हिंदुत्व म्हणून निवडून
येतात आणि निवडून आल्या नंतर हिंदुत्व विसरून जातात. आता तो त्या व्यक्तीचा दोष म्हणावा की खुर्चीचा दोष म्हणावा. म्हणून जात,
पात, धर्म, पंत, पक्ष विसरून हिंदुत्वासाठी “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” म्हणत निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. “होय हिंदू नेता
विधानसभा अपक्ष लढणारच, विरोधकांना ठणकावून सांगितले. तर 29 ऑक्टोबर रोजी बजरंगी अॅड. अमोल अंधारे अपक्ष उमेदवारी अर्ज
दाखल करणार आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून भाजप ही बंडखोरी रोखणार का? तर खामगाव मतदार संघात
चौरंगी लढत होणार आहे.
होय .. हिंदू नेता .. खामगाव विधानसभा अपक्ष लढणारच : विरोधकांना ठणकावले
0
9
4
9
9
0
Users Today : 21
Leave a comment