देवेंद्र फडणवीस आज चिखलीत! फडणवीसांच्या उपस्थितीत श्वेताताई महाले दाखल करणार उमेदवारी अर्ज; भाजपा – महायुती करणार मोठे शक्ती प्रदर्शन

Khozmaster
1 Min Read

चिखली : महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून चिखली विधानसभा

मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री व

महाराष्ट्र भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हे आज चिखली येथे येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.

श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज सादर होणार असून केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे

जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह महायुतीचे नेते याप्रसंगी उपस्थित राहणार असून भाजपा आणि महायुतीचे मोठे शक्ती

प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे.

आ. श्वेताताई महाले यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील खामगाव चौफुली येथून सकाळी ११ वाजता भव्य

रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक या मार्गे ही रॅली राजा

टावरच्या परिसरात आल्यानंतर तेथे रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होईल.

0 9 4 9 9 0
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *