निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक रविवारी येथील राष्ट्रवादी भवनात पार पडली. मविआच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या विजयासाठी एकजूटीचे या बैठकीत दर्शन झाले. आपला विजय निश्चित असून गुलाल आपणच उधळणार असा विश्वास नेते, पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
        बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस च्या रेखाताई खेडेकर ह्या होत्या तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेशराव पाटील, विजय अंभोरे, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, शिवसेना (उबाठा) संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, दिलीप जाधव माजी सभापती जि. प., प्रा. संतोषभाऊ आंबेकर, राष्ट्रवादी प्रदेश सचिव संजय गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, दीपक रिंढे, बी.टी. जाधव, पी.एम. जाधव, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख लखन गाडेकर, बुलडाणा विधानसभा प्रमुख डॉ. शरद काळे, प्रा. डी. एस. लहाने, शिवसेना तालुका प्रमुख सुनील घाटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे, चंदाताई बढे, आशाताई पवार, वर्षाताई इंगळे, नसीमभाई, रिजवानभाई, शैलेश खेडकर, मो.सोफियान, सिप्पलकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.