.. म्हणून बंजारा समाजाचा महायुतीला मिळतोय पाठिंबा! आज, आमदार संजय गायकवाडांना आशीर्वाद देण्यासाठी बंजारा समाजाचे धर्मगुरू मोताळ्यात

Khozmaster
3 Min Read

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय
गायकवाड यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. समाजातील विविध घटकांचा त्यांना वाढ़ता
पाठिंबा मिळत आहे. गेल्या ५ वर्षात केलेली हजारो कोटींची विकासकामे आणि पुढच्या ५ वर्षांचे
सुस्पष्ट व्हिजन यामुळे आता बंजारा समाज देखील मोठ्या प्रमाणात आ.गायकवाड यांना पाठिंबा देत
आहे. आज, १६ नोव्हेंबरला आ. गायकवाड यांच्या प्रचारार्थ मोताळ्यात बंजारा समाजाच्या
धर्मगुरूंच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा मोठा मेळावा होत आहे. सकाळी १० वाजता हा मेळावा
होणार असून या मेळाव्याला बंजारा समाजाची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी इथून श्री.डॉ. रामराव बापूजी
यांचे वंशज विधान परिषद आमदार मा. महंत श्री. बाबूसिंगजी महाराज, महापीठाधीश्वर महंत
श्री. सुनील महाराज, गोरबंजारा गुणधर्म पीठ भक्तीधामचे महंत श्री. जितेंद्र महाराज, महापिठाधीश्वर
महंत श्री कबीरदासजी महाराज, जयराम संस्थान राजगड चे महंत श्री रायसिंग महाराज यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे.

                                  या कारणामुळे बंजारा समाज वळतोय महायुतीकडे …
बंजारा समाज महाराष्ट्रातील लढवय्या, मेहनती आणि आपली परंपरा, संस्कृती जपणारा समाज आहे. या समाजाच्या वेशभूषा, नृत्य,
सण साजरे करण्याची पद्धती यातून हिंदुत्वाचे ठळक दर्शन होते. या समाजाकडून साजरे होणारे श्रीकृष्ण जन्माष्टमी व होळी हे सण
विशेष असतात. पोहरादेवीच्या श्री जगदंबेवर आणि संत सेवालाल महाराजांवर या समाजाची खूप श्रद्धा आहे. चैत्र महिन्यात येथे
होणाऱ्या यात्रेत महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा, राजस्थान या
राज्यातून भाविक येतात. संत सेवालाल महाराजांनंतर संत डॉ. रामराव बापू यांनी समाजाला मार्गदर्शन केले. जगदंबा देवीचे मंदिर,
संत सेवालाल महाराजांचे समाधी मंदिर, संत डॉ. रामराव बापूंचे स्मृती मंदिर ही पोहरादेवी येथील दर्शनीय स्थळे आहेत.

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असतांना या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी विकास आराखडा बनवण्यास सुरवात झाली. 593 कोटी
रुपयांच्या विकास आराखड्यात देवी मंदिराचा विकास, संत सेवालाल महाराज समाधी मंदिराचा विकास, संत सेवालाल महाराजांचा
अश्वारूढ पुतळा, भव्य आणि सुसज्ज असे भक्त निवास, नगाऱ्याच्या आकारात बांधलेले भव्य असे बंजारा समाजाची संस्कृती
दाखवणारे वस्तुसंग्रहालय, परकोट या कामांचा समावेश आहे. इतर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात
कधीही न झालेला या तीर्थक्षेत्राचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होत असल्याबद्दल बंजारा समाजात समाधानाची भावना
आहे. नगाऱ्याच्या आकारात बांधलेले ‘विरासत ए बंजारा’ हे वस्तुसंग्रहालय भाविकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. बंजारा समाजाची
संस्कृती दाखवणारी तांड्याची प्रतिकृती तेथे बांधली गेली आहे. बंजारा समाजातील महापुरूषांचे कार्य दाखवणारी अनेक भित्तिशिल्पे
आणि भित्तिचित्रे चितारण्यात आली आहेत. बंजारा समाजाची संस्कृती दाखवणारा प्रकाश आणि ध्वनीचा खेळ तेथील विशेष
आकर्षणाची बाब राहणार आहे. एकंदरीत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात जे ५० वर्षात झाले नाही ते माहिती सरकारने पोहरादेवी
तीर्थक्षेत्रासाठी केले आहे, त्यामुळे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात महायुतीकडे वळतो आहे.

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *