आज प्रचारतोफा थंडावणार! सायंकाळी ६ नंतर प्रचार बंद; आज-उद्या “गुप्तगू ….. “! परवा करेक्ट कार्यक्रम ….

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा : अंगाला बोचणाऱ्या बोचऱ्या थंडीत राजकीय गर्मी वाढली आहे . विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेला प्रचार आज सायंकाळी ६ नंतर बंद होणार आहे. प्रचार, सभा रॅली, यावर बंदी राहणार आहे तसे आदेश जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणूक निर्भय व निपक्षपतीणे पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७) १ जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मतदानाचा दिनांक व मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच १८
नोव्हेंबर २०२४ च्या सायंकाळी ६ वाजेनंतर कोणतेही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये असे आदेश दिले आहेत. शिवाय जे
राजकीय नेते, कार्यकर्ते सदर मतदार संघाचे मतदार नसतील अशा नेत्यांनी मतदानाच्या निश्चित केलेल्या दिनांकाच्या ४८
तास आधी मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार
आहे .
                                                                       मूक प्रचार जोर ..
आज सायंकाळ नंतर प्रचार बंद होणार असल्याने गुप्त भेटी गाठींवर उमेदवारांचा जोर राहणार आहे. आजची रात्र उद्याच्या
दिवस आणि उद्याची रात्र सर्वच उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. थेट मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर आता
उमेदवारांचा जोर राहील.परवा म्हणजेच २० नोव्हेंबरला उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे …

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *