बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, पोलिस बंदोबस्तात होणाऱ्या मतमोजणीतून सात विधानसभेच्या ११५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल असणार आहेत. या ठिकाणी होणार मतमोजणी
मलकापूर येतील मतमोजणी बाजार समितीच्या बेलाड यार्डमध्ये, बुलढाण्याची मतमोजणी निवडणूक इमारत, तहसील चौक, चिखलीमधील मतमोजणी तालुका क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, सिंदखेडा राजीतील मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार गोदाम, बाजार समिती परिसर मेहकरचीही मतमोजणी राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक ५ मध्ये खामगावात सरस्वती विद्यामंदिर हॉल, जळगाव जामोद येथील मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारतीत होईल. याप्रमाणे राहतील मतमोजणीच्या फेऱ्या
विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. मतदारांच्या संख्येनुसार फेऱ्या होणार आहेत. मलकापूरमध्ये २२, बुलढाण्यात २४, चिखलीमध्ये २३, सिंदखेड राजात २५, मेहकरमध्ये २५, खामगावात २३. जळगाव जामोदमध्ये २३ याप्रमाणे मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. प्रथम टपाली मतांची मोजणी होईल. मतमोजणीसाठी सातही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक कोतवाल, मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती केली आहे.
मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ञ्ज; ११५ उमेदवारांचा होणार फैसला उद्या सकाळी ८ वाजतापासून होणार मतमोजणी : २२ ते २५ फेऱ्या होणार!
Leave a comment