बुलडाणा : निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम सातही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचविण्यात आल्या. सात मतदारसंघातील स्ट्रॉगरूमच्या ठिकाणी जवळपास २५० शस्त्रधारी जवान दिवस-रात्र तैनात करण्यात आले आहेत. त्रिस्तरीय सुरक्षेमध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रांग रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम या त्यांच्या त्यांच्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालत होती. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जातीने हजर होते. त्यानंतर पोलिस सुरक्षेच्या घेऱ्यात सर्व वाहनांमधून इव्हीएम स्ट्रांग रूममध्ये गावनिहाय असलेल्या मतदान केंद्र क्रमांकानुसार लावण्यात आले आहेत
स्ट्रॉगरूमला त्रिस्तरीय सुरक्षा, केंद्रीय सुरक्षा दलही तैनात, चोख बंदोबस्त
Leave a comment