हार्ट बीट वाढले.. उमेदवारांचे देव पाण्यात! -लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का; कोणकोणत्या भावांना बसणार धक्का ? – ‘येऊन येऊन येणार कोण?’ रात्रभर पदाधिकाऱ्यांचा उहापोह ! – जिल्ह्यात 115 उमेदवारांसाठी उद्या मतमोजणी, जय्यत तयारी!

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा :सातही विधानसभा मतदारसंघातील तुल्यबळ उमेदवारांचे हार्ट बीट वाढले असून, त्यांनी आपले देव पाण्यात ठेवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ‘येऊन येऊन येणार कोण?’ असा रात्रभर पदाधिकाऱ्यांचा उहापोह बंधद्वार चर्चेत करण्यात आला. लाडक्या बहिणींनी मात्र यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवला असून, त्या कोणकोणत्या भावाला धक्का देणार हे उद्या समोर येईल.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, आता गुलाल कुणाचा? हे उद्या 24 ते 25 फेऱ्यानंतर कळणार आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 62.39 टक्के मतदान झाले. एरव्ही 57% पर्यंत मतदान होत असते. त्यामुळे परिवर्तन घडविण्यासाठी मतदार यंदाच्या निवडणुकीत पुढे आले आहे. बुधवारी मतदान झाल्यावर अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडे बंदद्वार चर्चेत आपणच निवडून येणार हे उमेदवाराला पटवून दिले. कोणत्या बुथवर कुणाला किती मतदान झाले असेल याचे आडाखे बांधल्या जात होते. उत्साही कार्यकर्ते उमेदवारांकडे विश्लेषण मांडून आपलाच विजय होणार असल्याचे सांगत होते. शिवाय विरोधकांच्या परिसरात किती मते मिळाली याची चाचणी केली जात होती.
परंतु अनेक उमेदवारांचे हार्ट बीट वाढल्याचेही दिसून येत होते.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून 115 उमेदवारांचा फैसला उद्या होणार आहे. सकाळी आठ वाजता पासून ही मतमोजणी तहसील चौकातील निवडणूक इमारतीमध्ये होणार असून तब्बल 25 फेऱ्या होणार असल्याचा अंदाज आहे. असे असले तरी, लाडक्या बहिणीने मतदानाचा टक्का वाढविला असून यंदा परिवर्तन निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *