अकोट प्रतिनिधी,विशाल गवई
राज्यस्तरीय क्रांतीयोध्दा पुरस्काराने पोलिस अंमलदार हिंम्मत दौलतराव दंदी यांना महाराष्ट्र नवक्रांती शिक्षण व पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य तसेच नटराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था वारखेड तालुका तेल्हारा यांच्या वतीने हा अकोट येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय क्रांती युद्ध पुरस्कार हिंम्मत दंदी यांना अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.पोलिस अंमलदार हिंम्मत दंदी यांचे सामाजिक काम पाहता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आ.रणजित पाटील, ठाणेदार नितीन देशमुख, महाराष्ट्र नवक्रांती पदवीधर संघटनेचे अध्यक्ष उमेश म्हसाये, विभागीय सल्लागार अतुल अमानकर मार्गदर्शक पद्मावती टिकार,पंकज ठेमरे, यांच्यासह विविध जिल्ह्यातून आलेल्या मान्यवरांची उपस्थिती होती.
Users Today : 9