तहसिल पोलीसांची कामगिरी : नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपींविरूध्द गुन्हा दाखल.
नागपूर, प्रतिनिधी :अमित वानखडे : दिनांक ११.०१.२०२५ चे संध्याकाळी 6.30 वाजता चे सुमारास पोलीस ठाणे तहसिल तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तकीया दिवानशाह, काळया झेडया जवळ, सलीम हॉटेलचे मागील गल्ली मध्ये एक हिरव्या रंगाचे डिझाईनचा कुर्ता व पायजामा घातलेला ईसम शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नमुद ठिकाणी पंचासमक्ष रेड कारवाई केली असता, मिळालेल्या वर्णनाचा ईसम मिळुन आला त्यास नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नावे मोहम्मद समीर अंसारी मोहम्मद जीमल अंसारी वय १९ वर्ष रा. तकीया दिवानशाह, नागपूर असे सांगीतले. त्याचे जवळील दोन प्लास्टीक पोत्यांची पाहणी केली असता, त्यामध्ये शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा मोनो काईट, मोनो गोल्ड, मोनो शक्ती लेबल असलेल्या मांजाच्या एकुण ६२ चक्री मिळुन आल्या. आरोपीचे ताब्यातुन असा एकुण १,०८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य हे कलम २२३ भा.न्या.सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम-१९८६, अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द पोलीस ठाणे तहसिल येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील कामगिरी मा. श्री. रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, मा. श्री. निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, मा. श्री प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर, मा. श्रीमती महक स्वामी, पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), मा. श्रीमती. अनिता मोरे, सहा. पोलीस आयुक्त (कोतवाली विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. संदीप बुआ, पोउपनि. रसुल शेख, सफौ. राजेश ठाकुर, पोहवा. रामकैलास यादव, पोअं. शेख नजीर, फिरोज, युनीस यांनी केली.
Users Today : 21