संत जगनाडे महाराज शासकीय आय.टी.आय. मध्ये उदयोजगता प्रेरणा कार्यक्रम संपन्न.
दि. 12 जानेवारी ला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि या जयंतीचे निमित्ताने राज्यातील 419 शासकीय ITI मध्ये 12जानेवारी ला उदयोजगता प्रेरणा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला IMC सदस्य श्री.अतुल बावणे,पॉवर ग्लो टूल्स चे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण वैद्य, प्रज्ञा प्रवाहाचे क्षेत्र संयोजक श्री. सुनील किटकरू, बांधकाम व्यावसयिक श्री. उल्हास जंगीटवार तथा संस्थेतुनच शिकून एक यशस्वी उदयोजक म्हणून नाव कामावले असे श्री. मनोहर घडोले उपस्थित होते,संस्थेच्या उपसंचालिका सौं. एस. एस. कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या, विध्यार्थ्यांना उपस्थित वक्त्यांनी विवेकानंद यांचे योगदान आणि आजचे विध्यार्थी यावर मार्गदर्शन केले. तसेच ITI अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उत्तम उदयोजक कसे व्हायचे या बद्दल स्वतःचे अनुभव कथन करत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य सौं. पंडिले यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे गटनिदेशक शिवाजी ढूमणे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विध्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.