डोंगरशेवली येथून माय-लेक बेपत्ता; अमडापूर पोलिसांत मिसिंग दाखल

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :
चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथून २५ वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलासह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी Amdapur Police Station येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरशेवली येथील रहिवासी लक्ष्मीबाई आनंदा सुरडकर (वय ५०) यांची मुलगी अश्विनी महिंद्र आराख (वय २५) ही आपल्या २ वर्षांच्या मुलासह ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली.
यानंतर नातेवाईक आणि परिसरात सर्वत्र शोध घेतला असता माय-लेकांचा काहीही मागमूस लागला नाही. त्यामुळे लक्ष्मीबाई सुरडकर यांनी ९ मार्च रोजी अमडापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
बेपत्ता असलेल्या अश्विनी आराख हिचा रंग काळा-सावळा असून तिने शेंदरी रंगाची साडी व काळ्या रंगाचे ब्लाउज परिधान केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या संदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ Amdapur Police Station येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अंमलदार निवृत्ती चेके यांनी केले आहे

0 9 3 9 9 8
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *