नाशिक शहरासह व जिल्ह्यामध्ये सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर मध्ये दर फलक लावण्याबाबत चे निवेदन नाशिक महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री मॅडम यांना श्री. दत्तात्रय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी) यांनी दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की लहान मुलापासून पासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत रुग्णांना आजार उद्भवल्यास सोनोग्राफी करावी लागते परंतु काही सोनोग्राफी सेंटरमध्ये विविध तपासणीसाठी सोनोग्राफी करावी लागते तेथे अंदाजे 700 रुपयांपासून ते विविध सोनोग्राफी तपासणीसाठी 20 हजार ते 22 घेतले जातात परंतु त्या रकमेची पावती रुग्णांना दिली जात नाही तरी आपल्या मार्फत प्रत्येक सोनोग्राफी सेंटर चालकांना दवाखान्यामध्ये विविध चाचण्यांची दर फलक लावण्यास सूचना द्याव्या व घेतलेल्या रकमेची पावती उपचार घेणाऱ्या रुग्णांना मिळण्यात यावी असे विषयाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत
माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आली तसेच नवीनच नाशिक महानगरपालिका येथे आयुक्त पदावर श्रीमती मनीषा खत्री मॅडम रुजू झाल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ व सिन्नर येथील पुरातन गोंदेश्वर मंदिराची प्रतिमा भेट देण्यात आली.दि.
Users Today : 18