अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या अमरावती विभागाचे महिला सक्षमीकरण शिबिर संपन्न झाले. यात रोटरी क्लब ऑफ अकोला इस्टने सक्रिय सहभाग घेतला. या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ अकोला इस्टच्या अध्यक्षा पूनम मुंदडा यांनी आपल्या सेवा उपक्रमाचे जुलै २०२४ पासून आतापर्यंत ३३ उपक्रम पूर्ण केले आहेत.यात रोटरी क्लबचे सेक्रेटरी मनोज माळोदे, ब्रिजमोहन चितलांगे, अशोक मुंदड़ा व समस्त रोटेरीयन यांचे सहकार्य मिळाले. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ अमरावती विभागाने जागतिक महिला दिनानिमित्त रोकडे मंगल कार्यालयात दोन दिवशीय महिला सक्षम व आत्मनिर्भर शिबिर आयोजित केले. सौ वनिता डोंगरे कार्यकारणी सदस्य, राष्ट्रीय दृष्टिहीन संघटना मुंबई यांच्या मार्गदर्शनात महिला सक्षमीकरण शिबिराचे आयोजन केले होते. आज दृष्टीहीन महिलांना अनेक समस्या भेडसावत आहेत, समाज दृष्टीही महिलांना योग्य ते शिक्षण रोजगाराच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित अनेक अडचणी येतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही. दृष्टीहीन महिलांना कौटुंबिक हिंसा आणि अत्याचारांना सामोरे जावे लागते, त्यांच्या आवडीनुसार त्यांना सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे मानसिक आरोग्य, निराशा, चिंतामुक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघाने हा उपक्रम राबविला. यात राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे पदाधिकारी, पीएसआय नयनाताई पोहेकर, रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्टच्या अध्यक्षा पुनम मुंदडा, ब्रिजमोहन चितलांगे आदी उपस्थित होते. या दोन दिवशीय शिबिराला राज्यातून विशेषता अमरावती विभागातील, शहर खेड्यापाड्यातील दृष्टिहीन महिला, निमंत्रित पुरुष उपस्थित होते. सर्व उपस्थितांना सामाजिक दायित्व म्हणून रोटरी क्लब ऑफ अकोला इस्टच्या वतीने स्नेहभोज प्रदान करण्यात आला. यात रोटरी इस्टचे रमण राठी, मनोज माळोदे, कोमल साधवाणी, डॉ. रघुनाथ खडसे श्याम गोटफोडे, विजय बाहाकर, पंचशील चौधरी, ओंकार गांगडे, भूषण ताजने, प्रीती ताजने, कमल वर्मा, सुनील साधवानी अशोक मुंदडा, पूनम मुंदडा आदीं उपस्थित होते. अशी माहिती विजय बाहाकर यांनी दिली
Users Today : 22