अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीच्या वतीने गोळेगाव, ता. बोदवड, जि. जळगाव येथील श्री. गजानन महाराज संस्थान मंदीराच्या उद्यान परिसरामध्ये आयोजित प्रादेशिक अधिवेशन तथा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सामाजिक सेवाभावी कार्यास्तव खानदेशात प्रसिद्ध असलेले रविंद्र काशिनाथ सोनार, गोळेगाव यांच्या संवैधानिक सामाजिक योगदानाची दखल घेऊन, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य विशेष उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात करण्यात आली.
यावेळी त्यांना संविधान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांनी करून त्यांचा संगठनच्या रा. अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यास्तव अमेरिकेतील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. विजयकुमार कस्तुरे, चिखली, राष्ट्रीय संघटन सचिव तथा साहित्यिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण आविष्कारासाठी अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. बबनराव महामुने, छ.संभाजीनगर, उपाध्यक्ष बशीर शेख, मुंबई, डॉ. अमरकुमार तायडे तथा नागसेन बुध्द विहार सचिव व सामाजिक कार्यकर्ते म्हणून साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. डी. व्ही. खरात, चिखली सह इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा नियुक्ती व सन्मान पत्र तथा शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Users Today : 22