अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
आधुनिक तंत्रज्ञानाच्या
वापाराने संगणक, मोबाइलच्या युगात अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यातीलच एक आहेचिमणी. मात्र, अशा या लहानशा जीवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कौलखेड येथील विलास भामोद्रे यांनी पुढाकार घेऊन चिमण्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलीकडे चिमण्याच दिसेनाशा झालेल्या असताना, या परिवाराचे अंगण चिवचिवाटाने बहरून गेले आहे. पाटबंधारे विभागात सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या विलास भामोद्रे यांच्याप्रती चिमण्यांनीही जिव्हाळा जपल्याचे दिसून येत आहे. चिमण्यांवरील प्रेमाचा प्रवास त्याच अंगणात सुरू झाला, जेथे ते दररोज पक्ष्यांचे निरीक्षण करत होते. ४ ते ५ चिमण्या रोज त्यांच्या अंगणात येत. तेव्हा त्यांना वाटले की, हे पक्षी दाणे आणि पाणी शोधत असावेत. त्यांना हवे होते, एक घरटे, एक ठिकाण जिथे ते सुरक्षितपणे बसू शकतात. त्यानंतर, त्यांनी ठरवले की, चिमण्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवायचे. हळूहळू त्यांच्या प्रेमाची नाळ चिमण्यांसोबत जुळत गेली आणि ४ ते ५ चिमण्यांचा छोटा समूह ५० ते ६० चिमण्यांमध्ये रुपांतरित झाला. जशी जशी वेळ गेली, तसेच चिमण्यांची संख्या वाढत गेली आणि अंगणात १५० ते २०० चिमण्या येऊ लागल्या आहेत. माझ्या कार्यात शिक्षिका असलेल्या माझ्या पत्नीचे खूप मोठे योगदान आहे. ती माझ्या या उपक्रमात नेहमी सहकार्य करत असते. प्रत्येकाने चिमण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि निसर्गासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प घेतला पाहिजे.
विलास भामोद्रे, पक्षी प्रेमी.
Users Today : 22