लोणार:-तालुका प्रतिनिधी
सातारा विभागाअंतर्गत येणाऱ्या मेढा आगाराची “मेढा-सातारा-लोणार” ही लांब पल्ल्याची एकमेव एसटी बसफेरी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. ही सेवा सेवानिवृत्त विभाग नियंत्रक धनाजीराव थोरात आणि विभागीय वाहतूक अधिकारी काशीनाथ पाटील यांनी प्रवासी सेवा संघटनेच्या मागणीनुसार सुरू केली होती. मात्र, २०१७ मध्ये पुलाच्या बांधकामाच्या कारणास्तव बसफेरी बंद करण्यात आली. २०१७ पासून प्रवासी संघटनेने वारंवार फेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. लोणार, रिसोड, मेहकर आणि सिंदखेडराजा येथील प्रवाशांसाठी बीड, बारामती, फलटण, सातारा आणि महाबळेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी ही बसफेरी अत्यंत महत्त्वाची होती. सुरुवातीला प्रवाशांची मोठी गर्दी आणि चांगले भारमान मिळत होते. महाव्यवस्थापक (वाहतूक), मुंबई यांनी राज्यभर बंद असलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही सातारा विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकारी या मागणीला टाळाटाळ होत आहे.
Users Today : 18