अकोला:-विशेष प्रतिनिधी
क्षयरोग आरोग्य कार्यालय मनपाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग दिनानिमित्त जठारपेठ स्थित रत्नम लॉन्स येथे कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत होमिओपॅथिक डॉक्टर्स असो, निमा, जीपीए आदी संघटनेच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला. या कार्यशाळे करिता होमिओपॅथिक डॉक्टर असो, ने पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण अग्रवाल होते.यावेळी डॉ किशोर मालोकार, डॉ. दिनेश राठी, डॉ. संजय तोष्णीवाल, डॉ. कौस्तुभ दासगुत्ता डब्ल्यूएचओ, एन. टीईपी, डॉ. आशिष गिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. नितीन लहाने, शहर क्षयरोग अधिकारी, डॉ. अनुप चौधरी, वैद्यकीय अधिकारी, डॉ. सचिन सदाफळे, डॉ. नितीन गायकवाड, डॉ रणमले, डॉ. चिमणकर, शहर क्षयरोग कार्यालयाचे उमेश पद्मने, हेमंत भाकरे, दीपक पाटील, शिवराज बबेरवाल, आशिष मनोहर, दिनेश घायवट, मयुरी मानकर, रुपेश वानखेडे, प्रतीक गाडगे इत्यादी उपस्थित होते. क्षयरोगला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी जनजागृती करण्याचे आवाहन डॉ अग्रवाल यांनी करीत क्षयरोग दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी डॉ. कौस्तुभ दासगुप्ता यांनी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये त्यांनी क्षयरोग विषयी विस्तृत माहिती, क्षयरोगाची कारणे, प्रतिबंध, कंट्रोल व उपचार यासंबंधी सर्वांना मार्गदर्शन केले. संचालन डॉ. वर्षा राव यांनी तर होमिओपॅथिक महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. सपना राजपूत यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी होमिओपॅथिक संघटनेचे सचिव डॉ. प्रशांत सांगळे, सदस्य डॉ. मंगेश तुळसकर, डॉ. प्रशांत इंगळे, डॉ. आदित्य नानोटी, डॉ. प्रदीप शहा, डॉ. वृषाली संगई डॉ. सृष्टी खरात, डॉ. नलिनी सांगळे, डॉ. उज्वल वागे यांनी अथक परिश्रम घेतले.
Users Today : 22