मूर्तिजापूर:-विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणार-या लाखपुरी सह इतर गावानमध्ये नेहमी लाईट दिवसा व रात्री चालु बंद राहत असल्यामुळे नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे. अंधारात राहाण्याची वेळ आली आहे. लाखपुरी व इतर गावातील विद्युत उपकरण शॉट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री बेरात्री लाईट बंद राहत आहे. त्यामुळे घरात असलेला महागड्या वस्तू फ्रिज , टिव्ही, कॉम्प्युटर, पंखा सह इ. वस्तूची नुकसान होवु शकते सदर समस्ये कडे महावितरण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असुन संबधित दुर्गवाडा फिटर अंतर्गत जे काही गावे येत आहे. त्या गावातील लाईन नेहमी बंद राहत आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणा-या सर्व गावातील लाईनच्या समस्यानचे प्रश्न सोडवाव्यात हि मागणी परिसरातील नागरिकांन कडुन होत आहे.
Users Today : 18