“लोकशाहीची ताकद वाढली: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल” “निवडणुकांचा मार्ग मोकळा – महसूल मंत्री बावनकुळे यांचा ट्विटद्वारे आनंद व्यक्त”

Khozmaster
1 Min Read
Oplus_131072

“लोकशाहीची ताकद वाढली: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल”

“निवडणुकांचा मार्ग मोकळा – महसूल मंत्री बावनकुळे यांचा ट्विटद्वारे आनंद व्यक्त”

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेत लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली आहे. या निर्णयाचे स्वागत महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून केले असून, त्यांनी कार्यकर्त्यांच्या हक्कांचे रक्षण झाल्याचे आनंदाने नमूद केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी, चौंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना हा निर्णय जाहीर झाला. बावनकुळे यांनी ट्विटमध्ये नमूद केले की, “ही पावनभूमी आणि हा ऐतिहासिक निर्णय – यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत” या संकल्पनेचा उल्लेख करत, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदेपंडितांशी केलेल्या सल्लामसलतीचा उल्लेख करून त्यांनी हे यश सरकारच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे म्हटले.

ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. समाजसेवेसाठी तन, मन, धन अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंदाचे हास्य उमटले आहे.”

0 9 4 5 4 4
Users Today : 9
TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *