अंतर योग गणेश विद्या महायज्ञ
भारताला विश्वगुरु बनविण्याचा ऐतिहासिक महासोहळा
नवी मुंबई – भारताला आध्यात्मिक विश्वगुरु बनविण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल म्हणून, अंतर योग फाउंडेशन च्या वतीने “अंतर योग गणेश विद्या महायज्ञ” हा भव्य आणि अद्वितीय कार्यक्रम रविवारी, ११ मे २०२५ रोजी, सकाळी ७.३० ते रात्री १०.३० या वेळेत सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. या दिव्य महासोहळ्याचे नेतृत्व आचार्य उपेन्द्रजी करणार आहेत.
कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
नोंदणीसाठी भेट द्या: https://ganeshvidya.antaryogfoundation.in
या महायज्ञाचा उद्देश प्रत्येकाच्या आयुष्यातील अडथळे दूर करून संपत्ती, यश व आरोग्यप्राप्ती सुनिश्चित करणे हा आहे. ५ कोटी श्री गणेश बीजमंत्र जप, २ लाख व्यक्तिगत जप साधना, शक्तिशाली यज्ञविधी, दुर्मिळ सरस्वती आणि शिव साधना, तसेच गणपती अथर्वशीर्ष सहस्रावर्तन या माध्यमांतून साधकांना मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा गहन अनुभव येणार आहे.
या कार्यक्रमात आचार्य उपेन्द्रजींच्या लेखणीतून साकारलेले गणेश अथर्वशीर्षावरील जगातील सर्वात सखोल विश्लेषणात्मक पुस्तक देखील प्रकाशित होणार आहे.
राजकारण, उद्योग, अध्यात्म आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर पाहुणे तसेच हजारो साधक यावेळी उपस्थित राहणार आहेत. जगभरातील साधकांसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (online streaming) उपलब्ध असेल.
विशेष आकर्षण:
दुर्मिळ आध्यात्मिक साधना आणि शक्तिपात अनुभव
सरस्वती साधना – विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती व तृतीय नेत्र जागृती
दुर्गा सप्तशती बीज मंत्र महायज्ञ – शक्ती, संपत्ती व ज्ञानासाठी
शिव साधना – रोगमुक्तीसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी
आयुष्यातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती आणि मनोकामना पूर्तीचा ४८ दिवसांचा परिणाम
आचार्य उपेन्द्रजी म्हणतात, “ही साधना प्रत्येकासाठी जीवनात अमूल्य परिवर्तन घडवून आणणारी आहे. स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, एकाग्रता वाढवणारी आणि दैवी संरक्षण देणारी आहे.”
कार्यक्रम तपशील:
तारीख: रविवार, ११ मे २०२५
स्थळ: सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई
वेळ: सकाळी ७.३० ते रात्री १०.३०
संपर्क: ९१ ७७१०९ ४८४६१
नोंदणीसाठी: https://ganeshvidya.antaryogfoundation.in
सर्वांना या आध्यात्मिक जागृतीच्या महायज्ञात
सहभागी होण्यासाठी हार्दिक निमंत्रण!
Users Today : 2