“महाकाल के संग होळी के रंग” संगीत कार्यक्रमात रसिक रंगतील सुरांच्या साजात!

Khozmaster
2 Min Read

“महाकाल के संग होळी के रंग” संगीत कार्यक्रमात रसिक रंगतील सुरांच्या साजात!

नागपूर, ११ मे २०२५ – स्वरदर्पण म्युझिक अकॅडमी तर्फे “महाकाल के संग होळी के रंग” हा भव्य संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. नागपूरमधील लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक हॉल येथे सायंकाळी ५:३० ते रात्री ९:३० दरम्यान हा कार्यक्रम पार पडेल.

या कार्यक्रमात ४० हून अधिक विद्यार्थी सहभागी होतील आणि विविध संगीतमय सादरीकरणांनी रसिकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतील. संगीत दिग्दर्शन सौरभ किल्लेदार करतील, तर लाईट आणि साउंडचे संयोजन अशोक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.

हा कार्यक्रम विद्यावाचस्पती डॉ. मिनाक्षी वडबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जाईल. नागपूरच्या संगीतप्रेमींना हा कार्यक्रम एक संस्मरणीय अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.

– मागील १४ वर्षांपासून “स्वददर्पण – म्युझिक अकादमीमार्फत, विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना संगीताची उपासना शिकवली जाते. संध्याताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या संस्थेमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक विद्यार्थी संगीत साधना करतात.

अकादमी विद्यार्थ्यांच्या कला प्रकटतेसाठी दरवर्षी विविध संगीतमय उपक्रमांचे आयोजन करत असते. याआधी “एक शाम शहीदों के नाम”, “वतन के लिये”, “भरारी मराठी गाण्यांची”, “अभंग स्पर्धा” यांसारख्या यशस्वी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षीची संकल्पना विशेष आहे — “होली म्हणजे महादेवाशी एकात्म होणे”. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी महादेवाच्या विविध रूपांवर आधारित गीते, कथानकं आणि सादरीकरण तयार केले आहे. कुणी भस्मधारी शिवाचे वर्णन करणार आहे, तर कुणी शांत संयमधारी रूप उभं करणार आहे. विविध भावना, स्वरूपं, आणि दृष्टिकोनातून “महाकाल” आणि “होली” या दोघांचा संगम रंगभूमीवर साकारला जाणार आहे.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेचा आणि मेहनतीचा प्रतीक आहे.

0 9 4 7 1 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *