राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे – शंकरराव वानखेडे यांची मागणी
२० मे रोजी मुंबईत भव्य आंदोलनाचा इशारा
नागपूर: महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाज संघटनेने राज्य शासनाकडे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष शंकरराव वानखेडे यांनी ही मागणी करत २० मे रोजी मुंबईत भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
वानखेडे यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करणे गरजेचे आहे. सध्या अनुसूचित जातींमध्ये ५९ जाती असून १३% आरक्षण असले तरी काही विशिष्ट जातींनाच त्याचा लाभ होत आहे.”
त्यांनी सांगितले की, “मांग, मातंग, मांग गारुडी, चांभार, ढोर, सुदर्शन वाल्मिकी, खाटीक, बुरड, डक्कलवार, मेहकर आदी जातींना आरक्षणाचा फारसा लाभ मिळालेला नाही. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही वंचित घटकांसाठी इम्पेरिकल डाटा गोळा करून त्याचे विश्लेषण करावे व न्याय द्यावा.”
पत्रकार परिषदेला संघटनेचे अरविंद डोंगरे, रामसिंग लोंढे, क्रिष्णा कांबळे, प्रभूदास तायवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास २० मे रोजी मुंबईत मोठे आंदोलन होणार असल्याचा इशारा संघटनेनेदिला आहे.
Users Today : 2