“बेलतरोडी पोलिसांची मोठी कारवाई – अवैध गोवंश वाहतूक उधळली, चारजण अटकेत”

Khozmaster
2 Min Read
Oplus_0

“बेलतरोडी पोलिसांची मोठी कारवाई – अवैध गोवंश वाहतूक उधळली, चारजण अटकेत”

नागपूर, ११ मे २०२५: बेलतरोडी पोलिसांनी जबलपूर हायवेवर पाझरी टोल नाक्याजवळ मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. त्यांनी एका आयशर वाहनातून विविध रंगांचे १० बैल जातीजातेचे गोवंश निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत एकूण ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई ९ मे रोजी पहाटे १:३० च्या सुमारास करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पाझरी टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. त्यानंतर येणाऱ्या आयशर वाहन (MH-8471 40C) ची झडती घेतली असता, त्यात गोवंश दाटीवाटीने कोंबून नेले जात असल्याचे आढळले.

गाडीतील चौघे आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

१. ज्ञानेश्वर रमेश गवळी (२५, रा. येडशी, वाशीम)

२. शोहेल सलीम खान (२२, रा. सेलू बाजार, वाशीम)

३. शरद बंडू राऊत (३२, रा. नागी पो, वाशीम)

४. वैभव विनोद चौधरी (२५, रा. चिखली, वाशीम)

यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे त्यांच्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ड)(ज) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५(अ), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. रश्मिीता राव साहेब, पोलिस उपआयुक्त, परी. कं. ०४, नागपुर शहर, मा. नरेन्द्र हिवरे साहेब, सहा. पोलिस आयुक्त अजनी विभाग, वरीष्ठ पोलिस निरिक्षक, श्री. मुंकुद कवाडे, यांचे मार्गदर्शनामध्ये पो उप नि श्रीकात गोंडे पो हवा अंकुश चौधरी पोहवा रविन्द्र आखरे पोहवा शैलेश बडोदेकर, नापोशि हेंमत उईके, चालक पोशि अतूल सरकटे पोशि अतूल जाधव यांनी केली.

0 7 1 6 7 7
Users Today : 104
TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *