नागपूरमध्ये एम.डी. ड्रग्ज व पिस्तूलसह चार जण अटकेत, एक फरार; 6.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
एन.डी.पी.एस. पथक , गुन्हे शाखा नागपूर शहर यांची संयुक्त कारवाई; शहरातील अमली पदार्थाच्या व्यापाराला मोठा धक्का

नागपूर, 11 मे 2025 – नागपूर शहरातील कपीलनगर व पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एन.डी.पी.एस. पथक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये 86 ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज, एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, सहा मोबाईल, दोन दुचाकी वाहने असा एकूण 6,31,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.

प्रकरण 1: कपीलनगर पोलीस ठाणे हद्दीतील कारवाई
तारीख: 10.05.2025
वेळ: रात्री 10:30 ते 11:55
स्थळ: न्यू म्हाडा क्वॉर्टरकडे जाणाऱ्या टी-पॉइंटजवळ, एसडीपीएल कॉलनीजवळ, कपीलनगर, नागपूर
गुन्हा नोंद: अप.क्र. 336/2025, कलम 8(क), 22(4), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट-1985
अटक आरोपी:
1. शेख सलमान शेख कलीम (वय 34), रा. न्यू म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. क्वॉर्टर, बिल्डिंग क्र. 20, ब्लॉक, चौथा मजला, क्वॉर्टर क्र. 406, अशोक सम्राटनगर, पो. ठा. कपीलनगर, नागपूर
2. शेख शाहरुख शेख कलीम (वय 27), रा. वरील पत्ताच
3. स्वप्नील उर्फ बिडी नरेश जांभुळकर (वय 22), रा. गड्डीगोदाम, चुडीवाली गल्ली, पो. ठा. सदर, नागपूर
जप्त मुद्देमाल:
20 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज – किंमत 1,00,000/-
4 मोबाईल – किंमत 40,000/-
स्प्लेंडर मोटारसायकल – किंमत 50,000/-
एकूण किंमत: 1,90,000/-
प्रकरण 2: पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कारवाई
तारीख: 11.05.2025
वेळ: 01:45 ते 03:55
स्थळ: लाल दरवाजाकडे जाणाऱ्या रोडवर, शिव मंदिर समोर, सार्वजनिक रस्ता, पो. ठा. पाचपावली
गुन्हा नोंद: अप.क्र. 357/2025, कलम 8(क), 22(क), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट सह 3+25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम
अटक आरोपी:
4. हैदर परवेज मोहम्मद ताजीम अन्सारी उर्फ पठानभाई (वय 26), रा. बंगाली पंजा, लेडी तलाव, अज्जत किराणा स्टोअर्सजवळ, पो. ठा. पाचपावली, नागपूर
जप्त मुद्देमाल:
66 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज – किंमत 3,30,000/-
1 मोबाईल – किंमत 10,000/-
डिओ मोपेड – किंमत 50,000/-
1 पिस्तूल – किंमत 50,000/-
1 जिवंत काडतूस – किंमत 1,000/-
एकूण किंमत: 4,32,000/-
फरार आरोपी:
शेख मुकर्रम (वय अंदाजे 40), रा. मियंबी, जिल्हा वणी
गुन्हेगारी पार्श्वभूमी:
शेख सलमान शेख कलीम याच्यावर कपीलनगर, जरीपटका, तहसील पोलीस ठाण्यांमध्ये आर्म्स अॅक्ट, कलम 307 भादंवि अंतर्गत 4 गुन्हे दाखल आहेत.
शेख शाहरुख शेख कलीम याच्यावर 302, 364, 34 भादंवि, पोस्को अॅक्ट, अॅट्रॉसिटी अॅक्टसह एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हे नोंदवले आहेत.
हैदर परवेज अन्सारी उर्फ पठानभाई याच्यावर कळमेश्वर व पाचपावली पो.ठा. येथे फायरिंग, गंभीर मारहाण व अमली पदार्थ व्यापाराशी संबंधित गुन्हे नोंदवलेले आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संजय पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
सपोनि गजानन गुल्हाणे
सपोनि मनोज घुरडे
पोहवा विजय यादव
पोहवा अरविंद गेडेकर
पोहवा मनोज नेवारे
पोहवा शैलेश दोबोले
पोना विवेक गजभिये
मपोना अनुप यादव
पोना गणेश जोगेकर
पोअं संहित काळे
पोअं सुभाष गजभिये
पोअ सहदेव चिखले
पोअ अमन राऊत
चा.पो.शी. राहुल पाटील
संपूर्ण तपास एन.डी.पी.एस. पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांच्याकडून सुरू आहे.
Users Today : 1