“मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन”; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

Khozmaster
1 Min Read

राजस्थान :- 

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. त्यांची ११ वर्षांची मुलगी वर्तिका हिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. माझे पप्पा खूप चांगले होते. शत्रूचा खात्मा करून ते स्वतः शहीद झाले. माझ्या पप्पांनी देशाचं रक्षण केलं आहे. मी रात्री ९ वाजता पप्पांशी शेवटचे बोलले होते. मी पप्पांना सांगितलेलं की, इथे ड्रोन उडत आहेत, पण कोणतेही हल्ले होत नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.”
“पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे. मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन. मी दहशतवाद्यांना मारेन.” रविवारी शहीद सुरेंद्र मोगा यांचं पार्थिव झुंझुनू येथील मांडवा येथे पोहोचलं. मांडवा शहरातील बिसाऊ क्रॉसिंगवरून त्यांचे पार्थिव मेहरादासी गावात आणलं. यावेळी मोठ्या संख्येने तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

0 9 5 0 3 5
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *