राष्ट्रीय खैरे कुणबी संघटनेची केंद्रीय कार्यकारिणी जाहीर – नागपुरात ऐतिहासिक अधिवेशन

राष्ट्रीय खैरे कुणबी संघटनेची केंद्रीय कार्यकारिणी जाहीर – नागपुरात पहिले ऐतिहासिक महाअधिवेशन यशस्वी
नागपूर, ११ मे २०२५:
विदर्भ खैरे कुणबी समाज संघटनेच्या वतीने पहिले ऐतिहासिक महाअधिवेशन नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात राष्ट्रीय खैरे कुणबी संघटनेची तीन वर्षांसाठीची केंद्रीय कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
या नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या:
गुणेश्वर आरीकर – राष्ट्रीय अध्यक्ष, नागपूर
राजेश ठाकरे – राष्ट्रीय महासचिव, रामटेक
श्याम लेडे – राष्ट्रीय उपाध्यक्ष, चंद्रपूर
प्रा. शेषराव येलेकर – राष्ट्रीय कार्याध्यक्ष, गडचिरोली
शिवशंकर मुंघाटे – राष्ट्रीय कोषाध्यक्ष, भंडारा
रत्नदीप म्हशाखेत्री – राष्ट्रीय सहकार्याध्यक्ष, गडचिरोली
अशोक मस्के – राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष, अकोला
रवींद्र निरगुडे – राष्ट्रीय चिटणीस, बुलढाणा
बाबाराव भोयर – राष्ट्रीय सहचिटणीस, वर्धा
विनायकराव कुकडे – राष्ट्रीय सहसचिव, गोंदिया
लक्ष्मणराव घोटेकर – राष्ट्रीय समन्वयक, यवतमाळ
शाहू भोयर – राष्ट्रीय संघटक, अमरावती
सतीश देशमुख – राष्ट्रीय संघटक, वाशिम
राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार मंडळात पुढील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे:
देवराव रडके – माजी आमदार, कामठी
सुभाषराव धोटे – माजी आमदार, राजुरा
अशोकराव शिंदे – माजी आमदार, हिंगणघाट
करण देवतळे – आमदार, वरोरा
प्रा. ज्ञानेश वाकुडकर – साहित्यिक, नागपूर
डॉ. विजयराव देवतळे – चंद्रपूर
अरुण डोंगरे – माजी जिल्हाधिकारी
चिंतामणराव डहाळकर – माजी उपजिल्हाधिकारी
दिगंबरराव गुरपूडे – माजी उपाध्यक्ष, जि.प. चंद्रपूर
प्रशांत वाघरे – सामाजिक कार्यकर्ता, गडचिरोली
डॉ. अनिल चिताळे – माजी कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
सौ. रत्नमालाताई भोयर – माजी नगराध्यक्ष, मुल
या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर राष्ट्रीय अध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांचे व इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित समाजबांधवांकडून स्वागत करण्यात आले.
सभेमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त एकच नाव – राष्ट्रीय खैरे कुणबी संघटना – वापरण्याचा ठराव पारित करण्यात आला. वेगवेगळ्या नावांनी चालणाऱ्या समाज संघटनांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असून, एकसंध नेतृत्व निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे.
यावेळी समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांना नोटबुक्स, संविधानाच्या प्रती व तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता वाटण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणेश्वर आरीकर यांनी केले. प्रतीक्षा भास्कर थुटे यांनी संचालन केले, तर विजयाताई धोटे यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Users Today : 54