उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी विद्यार्थी परिषदेची सकारात्मक चर्चा

Khozmaster
1 Min Read

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी विद्यार्थी परिषदेची सकारात्मक चर्चा

नागपूर, १० मे २०२५:

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नागपूर महानगर शाखेच्या शिष्टमंडळाने आज रवी भवन येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन राज्यातील शैक्षणिक समस्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा केली.

या बैठकीत विदर्भ प्रांताचे प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत पर्वत, प्रांत मंत्री कु. पायल किनाके, नागपूर महानगर अध्यक्ष प्रा. अभय मुद्गल, महानगर मंत्री कु. दुर्गा भोयर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शैक्षणिक संस्थांची सध्याची स्थिती, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, व शासनस्तरावर आवश्यक धोरणात्मक बदल या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

मा.मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अनेक मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने ही चर्चा अत्यंत फलदायी ठरली असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

वरील माहिती नागपूर महानगर मिडिया संयोजक ऋत्विक डोंगरवार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *