प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगरचा शंभर टक्के निकाल – विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ. 10 वी च्या निकालात प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर, नागपूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून यंदाही शाळेने 100% निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. गुणवत्ताधारित यादीत स्थान पटकावून विद्यार्थ्यांनी शाळेच्या नावलौकिकात लक्षणीय भर घातली आहे.
टॉपर्स यादी:
1. कार्तिक बोराडे – 92.80%
2. जितेश आमने – 84.80%
3. चैतन्य सहारे – 81.20%
4. आर्य कीर्तीवार – 77.60%
5. रोहन श्रीरामे – 76.80%
शाळेतील बहुतांश विद्यार्थी 85% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले असून, अनेक विद्यार्थ्यांनी 80% चा टप्पा पार केला आहे. 70% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे.
या यशाच्या पार्श्वभूमीवर शाळेचे अध्यक्ष एड. अशोक बनसोड, उपाध्यक्ष भालचंद्र कागभट, सचिव विजय कागभट आणि मुख्याध्यापिका सौ. वंदना कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी म्हणाल्या, “या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा अमूल्य पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचे हे यश अधिक गौरवास्पद आहे.”
शाळेतील यशामुळे संपूर्ण प्रहार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Users Today : 54