उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दीड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी

KHOZ MASTER
2 Min Read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दीड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी

मुंबई, दि. 16 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ (C3IT) स्थापन करण्यास मंजूरी मिळाली आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून या दोन जिल्ह्यांसाठी 191 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून, स्थानिक युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून या जिल्ह्यांसाठी C3IT स्थापन करण्याची विनंती केली होती. कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 191 कोटी रुपये खर्चून हे केंद्र मंजूर केले आहे. या केंद्रांमध्ये दरवर्षी 7 हजार युवकांना औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार असून, यामुळे मराठवाड्यातील उद्योग क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल.

अजित पवार यांच्या धडाकेबाज पुढाकारामुळे बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांसाठी तीन C3IT मंजूर झाले आहेत. मराठवाड्यातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य, एआय व तांत्रिक प्रशिक्षण मिळेल, ज्यामुळे ते उद्योगक्षम बनतील. पहिल्या तीन वर्षांसाठी या प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ उचलणार आहे. त्यानंतर हा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन विभागून करणार आहेत.

या निर्णयामुळे मराठवाड्यातील युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाची संधी मिळेल. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल आणि स्थानिक पातळीवर उद्योगपुरक वातावरण तयार होईल. अजित पवार यांच्या निर्णयक्षमतेचे नागरिकांमध्ये स्वागत केले जात आहे.

0 9 7 3 8 4
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *