नागपूरमधील झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पट्टे वाटप

Khozmaster
1 Min Read

नागपूरमधील झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पट्टे वाटप

नागपूर |

नागपूर महानगरातील अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या झोपडपट्टीधारकांना अखेर हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हैदराबाद हाऊसमध्ये आयोजित जनतेच्या दरबारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील २१ झोपडपट्टीधारकांना प्राथमिक स्वरूपात पट्टे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला हक्काच्या घरापासून वंचित राहू दिले जाणार नाही. प्रत्येक पात्र व्यक्तीला आपले घर मिळेल, यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

या उपक्रमाला नागपूरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनतेच्या दरबारात तब्बल १,०५१ निवेदने मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः स्वीकारली.

या निर्णयामुळे अनेक झोपडपट्टीधारकांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षिततेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

0 9 4 6 9 9
Users Today : 49
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *