नागपूर : शासकीय
कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी बदल्याप्रकरणी काही नियम आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. परंतु, जिल्हा परिषदेत नुकत्याच बदली प्रक्रियेत नियमांनाच तिलांजली देण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला. यंदा सर्व बदल्या नियमानुसार होतील. पात्र ठरणाऱ्या प्रत्येकाची बदली करण्यात येईल, तक्रार असणाऱ्यांचे टेबलसुद्धा बदलण्यात येतील, असा दावा
-मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनायक महामुनी यांच्याकडून करण्यात आला होता.
परंतु बदलींच्या नियमांना काहींसाठी बाजूला ठेवण्यात आले असून पाच वर्षानंतरही काहीजण त्याच विभागात कार्यरत आहे. काहींवर मेहरनजर दाखविण्यात आल्याने या बदल्यांवरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. यात प्रशासकीय, विनंती व आपसी असे एकूण ११२ कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या. पाच वर्ष एका विभागात असलेल्यांची बदली करणे आवश्यक आहे. परंतु नवीन इमारतीत वरच्या माळ्यावर काही कर्मचारी पाचपेक्षा जास्त वर्षापासून कार्यरत आहे. त्याच प्रमाणे जुन्या इमारतीमधील कार्यलयांमध्ये काही कर्मचारी पाचपेक्षा अधिक वर्षापासून कार्यरत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्या विभागप्रमुखांचा वरदहस्त
पाच वर्ष एका ठिकाणी व तीन वर्ष एकच टेबल सांभाळत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती विभागप्रमुखांनी सीईओंकडे देणे आवश्यक आहे. परंतु बदलीपात्र असतानाही काहीजण त्याच ठिकाणी आहेत. संबंधित विभागप्रमुखांकडून त्यांची नावे बदलीपासून लपविण्यात आली असून त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळल्या जात असल्याने वरदहस्त असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. त्यामुळे आता सीईओ यावर काही पाऊल उचलतात की ते त्यांचा दावा फोल ठरवितात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इमारतीमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ड्यू मागील वर्षीच झाला होता.
परंतु यावेळीही बदली करण्यात आली नाही. एक महिला कर्मचारीही पाचपेक्षा जास्त काळापासून एकाच ठिकाणी आहे.
सेवा संलग्न असलेल्या एका कर्मचाऱ्याची पुन्हा त्याच विभागात त्याच टेबलवर नियुक्ती करण्यात आली. बदल्यांच्या नियमांना फाटा देण्यात आल्याची चर्चा होत आहे. तर सीईओंनी केलेला दावाही फोल ठरल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा परिषदमध्ये बदली नियमांना तिलांजली पाच वर्षांनंतरही कर्मचारी विभागातच
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment