आय.आय.एच.टी. बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
हातमाग व वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमासाठी 10 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
नागपूर, दि. 20 मे: केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIHT) बरगढ (ओडिशा) व वेंकटगिरी (आंध्र प्रदेश) येथे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बरगढ येथे 14 व वेंकटगिरी येथे 2 जागा उपलब्ध आहेत.
या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून नागपूर, सोलापूर, मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) कार्यालयांमार्फत 10 जून 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
विदर्भातील 11 जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. 2, 8 वा मजला, “बी” विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001 येथे उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार 0712-2537927 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच, अर्जाचा नमुना आणि पात्रतेची माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे.
अधिकृत संकेतस्थळ www.dirtexmah.gov.in वरही अर्ज व आवश्यक माहिती पाहता येईल. नागपूरसह सोलापूर, मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) कार्यालयातही अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत.
राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी इच्छुक व पात्र उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी म्हणजेच 10 जून 2025 पर्यंत सर्व संबंधित प्रादेशिक कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
Users Today : 47