*दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महास्वयंम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ*

Khozmaster
2 Min Read
Oplus_131072

*दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महास्वयंम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ*

नागपूर,दि. 20: दहावी पास केल्यानंतर रोजगार कार्यालयात नोंदणी करणे हे खूपच महत्त्वाचे असते. यामुळे शासनाच्या विविध नोकरी व प्रशिक्षण संबंधित योजनांचा लाभ घेता येतो. नोंदणी केलेल्या उमेदवारांना शासकीय व खाजगी नोकरीच्या संधींबाबत वेळोवेळी माहिती मिळते. जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. रोजगार व स्वयंपूर्णतेसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांध्येही प्राधान्य दिले जाते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील नोंदणी आवश्यक असते.

रोजगार कार्यालयाकडून नोंदणी क्रमांक व अनुभव प्रमाणपत्र मिळते.(CMYKPY लागू असल्यास), जे नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेबाबत अपडेट्स मिळवण्यासाठीही ही नोंदणी फायदेशीर ठरते. त्यामुळे दहावीनंतर त्वरीत रोजगार कार्यालयात नोंदणी करणे हा सुजाण निर्णय ठरतो. यासाठी दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

*विद्यार्थी नोंदणीचे टप्पे*: http://www.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या. “रोजगार” टॅबवर क्लिक करा.”नोकरी शोधणारे लॉगिन / नोंदणी” निवडा. पहिल्यांदा नोंदणी केल्यास “रजिस्टर” वर क्लिक करा. जसे की:नाव, जन्मतारीख, पत्ता, जिल्हा, तालुका शैक्षणिक पात्रता (इयत्ता दहावी), आधार क्रमांक, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक हा आवश्यक तपशील भरा. युजरनेम आणि पासवर्ड तयार करा. आपला फोटो आणि आयडी प्रूफ अपलोड करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. नंतर आपले रोजगार नोंदणी प्रमाणपत्र जतन करा किंवा प्रिंट करा.

*अधिक माहितीसाठी* :

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र नागपूर, प्रशासकीय इमारत क्र.२, ए-विंग, दुसरा मजला, सिव्हिल लाइन्स, नागपूर, दूरध्वनी: ०७१२-२५३१२१३ येथे संपर्क साधावा किंवा nagpurrojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

0 7 1 6 7 5
Users Today : 102
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *