नागपुरातून शेंगावकरिता जेष्ठांची भक्तिभावपूर्ण सहल

KHOZ MASTER
1 Min Read
Oplus_131072

नागपुरातून शेंगावकरिता जेष्ठांची भक्तिभावपूर्ण सहल

अमरनगर व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

नागपूर : ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर व अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २५ मे रोजी श्री संत गजानन महाराज देवस्थान शेगाव दर्शनासाठी एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीमध्ये ४५ जेष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या सहलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर, वसंतराव इझनकर, रमेश जिल्हारे, अशोक सांबारे, विलास वाकडे, रामदास माहुरे, गणपतराव निंबाळकर, अशोक माधवराव शिरपूरकर, रामकृष्णाजी बांगडे व धनराज भोयर यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे राजू मिश्राजी तसेच सचिव डॉ. सौ. राखी खेडीकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

संपूर्ण सहल भक्तिभाव, समविचार आणि सामूहिक आनंदाने परिपूर्ण होती, अशी भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.

0 9 7 3 8 4
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *