शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहिम : नित्कृष्ट तणनाशकांपासून बचावासाठी गोदरेज अग्रोव्हेटचे पुढाकार

KHOZ MASTER
1 Min Read

शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहिम : नित्कृष्ट तणनाशकांपासून बचावासाठी गोदरेज अग्रोव्हेटचे पुढाकार

अकोला : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नित्कृष्ट तणनाशकांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, गोदरेज अग्रोव्हेट या नामांकित कंपनीने शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांना दर्जेदार तणनाशकांची ओळख करून देणे व त्यांना सुरक्षित उत्पादन पद्धतीकडे वळवणे हा आहे.

गोदरेज अग्रोव्हेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. राजवेलू म्हणाले, “PYNA हा तणनाशकातील एक विश्वासार्ह ब्रँड असून मागील काही वर्षांपासून कंपनीने कापूस उत्पादकांसाठी तो उपलब्ध करून दिला आहे. बाजारात सध्या नित्कृष्ट दर्जाची तणनाशके वाढत चालली आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.”

हिटवीड या तणनाशकाची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर असे दिसून आले की, ते पूर्णपणे पाण्यात विरघळते आणि जमिनीवर व गवतावर प्रभावीरीत्या पसरते, त्यामुळे पिकांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही व पीक अधिक सशक्त राहते.

राजवेलू यांनी पुढे सांगितले की, “व्यवसायात तात्पुरत्या नफ्याऐवजी गुणवत्ता महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांचा विश्वास जपणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. आमच्या सर्व वितरक व भागीदारांना आम्ही आवाहन करतो की, दर्जेदार तणनाशकांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, जेणेकरून त्यांना भरघोस उत्पादन व नफा मिळवता येईल.”

0 9 7 3 8 4
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *