वरिष्ठ आदिवासी कार्यकर्ते ललित पवार यांचा भाजपात प्रवेश; अनेक कार्यकर्ते सहभागी
नवनियुक्त भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे मायाताई ईवनाते यांच्या निवासस्थानी स्वागत
नागपूर : माजी महापौर आणि जनजाती आयोग, भारत सरकारच्या माजी सदस्या श्रीमती मायाताई ईवनाते यांच्या निवासस्थानी 22 मे रोजी भाजप शहराध्यक्षपदी नियुक्त झालेल्या दयाशंकर तिवारी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चाही झाली.
याच कार्यक्रमात वरिष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्ते श्री ललित पवार यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ललित पवार यांना पक्षाचा दुपट्टा घालून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात गोंड राजे विरेंद्र शहा यांच्यासह संजय गिरगावर, शाम कार्लेकर, आकाश मडावी, प्रमोद कवरती, माजी नगरसेवक रोशन टेकाम, अर्जुन उईके, रवि पेंदाम, विवेक नागभिरे, प्रशांत कुमरे, मोनू धुर्वे, सदाराम गाते, रामदास उईके, रघु मडावी, रोहन उईके, रोहन मडावी, अनिकेत मडावी आदी अनेक युवा नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे नागपूरमधील आदिवासी समाजात भाजपचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Users Today : 27