राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू!
“एकमेका सहाय्य करू, अवेध धरू सुपंथ…” या ब्रीदवाक्याने आंदोलनास सुरुवात
📍 महाराष्ट्र, 3 जून 2025:
महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री. पवनकुमार केवटे (मो.: 8668868023) आणि सरचिटणीस श्री. अभय पाटील (मो.: 8482888292) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राबवले जात आहे.
या आंदोलनामागील प्रमुख उद्दिष्टे म्हणजे विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्क, अडीअडचणी तसेच तांत्रिक वेतनश्रेणी संदर्भातील मागण्या शासन दरबारी मांडणे आणि त्यासाठी निर्णायक लढा देणे.

🔴 कर्मचारी संघटनेच्या मुख्य मागण्या:
1️⃣ भू-अभिलेख विभागास तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी
2️⃣ परिरक्षण भूमापक व सर्वेअरची रिक्त पदे तातडीने भरावीत
3️⃣ EPCIS व व्हर्जन 2 प्रणाली कार्यक्षम करण्यात यावी
4️⃣ सर्व सर्वेअरना आवश्यक तांत्रिक साधने जसे की RoR प्रणाली व लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत
5️⃣ वर्ग 2 आणि वर्ग 3 अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पदोन्नती मिळावी
6️⃣ नवीन नगर भूमापन कार्यालये स्थापन करण्यात यावीत
7️⃣ शासन निर्णयानुसार विभागातील पदनामात आवश्यक बदल करण्यात यावेत
संघटनेने स्पष्ट केले आहे की मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. शासनाकडून त्वरित निर्णय घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
👉 आंदोलनाचे ब्रीदवाक्य:
“एकमेका सहाय्य करू, अवेध धरू सुपंथ…”
यामध्ये राज्यातील हजारो तांत्रिक कर्मचारी सहभागी होत असून, हे आंदोलन राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबवले जात आहे.
To Read Current News Join WhatsApp Group Click 👇
https://chat.whatsapp.com/IEyCxHcPjn95AWcUmMGQou
To Join Channel Click 👇
Users Today : 3