संरक्षित शेतीतून अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांचे आवाहन

KHOZ MASTER
2 Min Read

संरक्षित शेतीतून अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांचे आवाहन

नागपूर, ४ जून : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या दर्जामध्ये सातत्य राखण्यासाठी व अधिक उत्पादन घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरत आहे. हरितगृह (ग्रीन हाऊस) व शेडनेटगृहाच्या माध्यमातून शेतकरी उच्च दर्जाची फुले व भाजीपाला पिके घेत असून निर्यातीयोग्य माल निर्मितीच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी सांगितले की, “संरक्षित शेतीमुळे शेतकऱ्यांना उघड्या वातावरणाच्या तुलनेत चार ते पाचपटीने जास्त उत्पादन मिळते. त्यामुळे अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाकडे वळत असून सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.”

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, फळ कव्हर, तण नियंत्रक आच्छादन, तसेच नव्याने समाविष्ट केलेले हायड्रोनिक्स व एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी:

शेतकऱ्यांनी

http://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin

या महाडीबीटी पोर्टलवर ‘फलोत्पादन’ या घटकाखाली अर्ज करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर

http://Krishi.maharashtra.gov.in

भेट द्यावी किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

आवश्यक कागदपत्रे:

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी

सातबारा उतारा व 8-अ

आधारकार्ड व बँक पासबुक प्रत

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

हमीपत्र व चतु:सीमा नकाशा

शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेत संरक्षित शेतीकडे वाटचाल करून अधिक उत्पादन व आर्थिक स्थैर्य मिळवावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

To Join WhatsApp Group Click 👇

https://chat.whatsapp.com/IEyCxHcPjn95AWcUmMGQou

To Join Channel Click 👇

https://whatsapp.com/channel/0029Vb5wzzl4Y9lkKdFVcx0h 

0 9 7 3 8 4
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *